सांगली जिल्ह्यातील पलूस व कडेगाव तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावरील खड्डे पावसाळा चालू झाल्यापासून, गेली चार महिने झाले तसेच आहेत.
या खड्ड्यामुळे अनेक वाहनांचे अपघात झाले आहेत व अनेकांना अपघातात जायबंदी व्हावे लागले आहे व मृत्यू देखील झाले आहेत.
परंतु अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रारी करून पलूस तालुका सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता श्री.पाटील साहेब व कडेगाव तालुका सार्वजनिक बांधकाम उप अभियंता श्री.पोळ साहेब यांनी कोणतीही दखल घेतलेली दिसत नाही.
पुसेसावळी ते सांगली रोडवरील खड्डे कडेगांव तालुक्यातील रायगाव फाट्यापासून ते पलुस तालुक्यातील गावच्या वसगडे हद्दी पर्यन्त खड्डे तसेच आहेत.
पलुस व कडेगाव तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंता यांना वेळोवेळी तक्रार करून देखील दखल घेतली नाही.
म्हणून, कोल्हापूर विभागाचे सार्वजनिक बांधकाम अधिक्षक अभियंता मा.तुषार बुरुड साहेब यांना शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे
सदर तक्रारीची दखल न घेतल्यास सार्वजनिक बांधकाम अधिक्षक अभियंता मंडळ कोल्हापूर यांचे कार्यालयासमोर शेतकरी संघटनेच्या वतीने हलगी वादन आंदोलन करणार असल्याचे निवेदन शेतकरी संघटना कडेगाव तालुका अध्यक्ष परशुराम माळी यांनी दिली आहे.

Post a Comment
0Comments