अल्ताप शिकलगार वांगी :
स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा स्मृतिदिन वांगी (ता. कडेगाव) येथे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने वांगी ग्रामस्थ व सरसेनापती हंबीरराव मोहिते प्रतिष्ठानने तळबीड (ता. कराड) येथून आणलेल्या ज्योतीचे पूजन करण्यात आले. स्वराज्याची सेवा करीत असताना १६ डिसेंबर १६८७ रोजी सर्जा खानबरोबर वाई येथे सुरू असलेल्या लढाईत तोफेचा तुकडा लागून हंबीरराव मोहिते यांचा मृत्यू झाला. त्यांचा स्मृतिदिन वांगी येथे विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या नंतर सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कार्याची माहिती दिली. या कार्यक्रमानंतर विविध उपक्रमाची सुरुवात करण्यात आली .
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश मोहिते, माजी सरपंच विजय होनमाने, बाबासाहेब सूर्यवंशी,रामचंद्र देशमुख ,ब्रिजराज मोहिते, गोरख कांबळे, केशव मोहिते, राहुल मोहिते, महेश देशमुख,रवींद्र कांबळे,दाजीराम मोहिते,रमेश एडके, अमोल मोहिते, बाळासाहेब मोहिते, मोहन मोहिते, दत्ता चव्हाण , रत्नराज जाधव, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0Comments