वांगी (ता. कडेगांव) : कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाल्याने वांगी गावात ऊस तोडणी कामगार तसेच गावात सध्या बागायती क्षेत्र जास्त असल्याने शेतीतील कामाकरीता इतर जिल्यातील कामगारांची संख्या वाढली आहे.
असेच अनेक कामगार वास्तव्यास आहेत
त्यामुळे साहजिकच विजेचा वापरही वाढला आहे परंतु ही वीज चोरून वापरली जाते वांगी गावात देवराष्ट्रे रोडला पोट पाटा लगत असणाऱ्या डीपी पासून पुढे अनेक विद्युत खांबावरून सर्रास उघडपणे वीज चोरी होत आहे. काही स्थानिक नागरिकांकडूनही उघड वीजचोरी सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.
ज्यामुळे नागरिकांना वारंवार खंडित होणाऱ्या विजेचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रोज सकाळी नित्य नियमाने कर्मचाऱ्याला फोन करून डीपितील फ्युजा बदलण्यासाठी बोलवावे लागते आहे.
या बद्दल सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना तंतोतंत माहिती असतानाही कर्मचारी अथवा अधिकारी कोणतीही कारवाई करत नाहीत ही, आश्चर्याची बाब आहे.

Post a Comment
0Comments