yuva MAharashtra खाजगी सावकारी करणाऱ्यांवर कारवाई करा: मनसे कडून निवेदन

खाजगी सावकारी करणाऱ्यांवर कारवाई करा: मनसे कडून निवेदन

Admin
By -
0

 


कडेगाव तालुक्यात खाजगी सावकारकी, पतपेढ्या व खाजगी बँकांच्या नावाखाली बेकायदेशीर जादा व्याजदराने दिल्या जाणाऱ्या कर्जांना आळा घालावा.


कडेगाव तालुक्यात काही खाजगी सावकार पतपेढ्या आणि खाजगी बँकांचे नाव पुढे करून किंवा त्यांच्यामार्फत असल्याचे भासवून महिना ७ टक्के ते १० टक्के या अवास्तव व्याजदराने कर्ज वाटप करत आहेत. हा प्रकार सर्रास सुरू असून अनेक सामान्य नागरिक, शेतकरी व लघु उद्योजक यांना आर्थिक संकटात ढकलले जात आहे.



यामुळे अनेक कुटुंबे कर्जाच्या विळख्यात सापडत असून त्यांना न्याय मिळणे आवश्यक आहे. आपण या बेकायदेशीर सावकारी विरुद्ध तातडीने कठोर पावले उचलावीत. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विरोधात तीव्र आंदोलन छेडेल.

तरी, या बाबीची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ योग्य ती कारवाई करावी.असे निवेदन जिल्हा उपनिबंधक आणि जिल्हा पोलिस उपअधीक्षक यांना कडेगांव तालुका मनसेकडून देण्यात आले आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)