वांगी ता.कडेगांव येथे वाल्मिकनगर जवळ दोन कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात पती पत्नी जागीच ठार तर पाच जण जखमी झाले.
चिंचणी वांगी पोलिस ठाणे कडून मिळालेली अधिक माहिती अशी की, ओमनी गाडी ( क्रमांक MH-42 AH-1047) चालक विकास भिकू मोहिते रा. खटाव ता. खटाव जि. सातारा वय 42 वर्षे हे गुरुवार रात्री 11:45 दरम्यान वाल्मिक नगर, वांगी कडेपूर रोड येथे आले असता,
कडेपुरहून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर काळ्या पिवळ्या रंगाची (गाडी क्रमांक MH-11 BD-5797) चालक जमीर इलाही आवटी रा. महाबळेश्वर ता. महाबळेश्वर जि. सातारा वय 45 वर्षे यांनी समोरून येणाऱ्या ओमनीला जोराची धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की ओमनी गाडीतील चालक विकास मोहिते व त्यांच्या पत्नी पुष्पा मोहिते यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातातील मयत पती पत्नीतसेच स्विफ्ट डिझायर गाडीचे चालक जमीर आवटी व ओमनीतील प्रवासी ऋतुजा रोहित तोरसे, विजया प्रकाश तोरसे, आरोही रोहित तोरसे,आर्या अरुण तोरसे हे गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना कराड येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघातात दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले आहे.
सदर घटनेची फिर्याद ऋतुजा रोहित तोरसे वय 36 वर्षे रा. खटाव ता.खटाव जि. सातारा यांनी दिली असून,पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार करीत आहेत.


Post a Comment
0Comments