फोटो ओळ : श्रेयश मोहिते याची गुजरात येथे होणाऱ्या पथसंचलनसाठी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयात सत्कार करण्यात आला
वांगी : पुणे येथील भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचा तृतीय वर्षाचा विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक श्रेयश राजेंद्र मोहिते याची नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय पथसंचलन पूर्व निवड चाचणी शिबिरातून वेस्ट झोनल पथसंचलन पूर्व शिबिरासाठी निवड झाली आहे.
हे शिबिर ३१ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर २०२५ दरम्यान हेंमचंद्रचर्या नॉर्थ गुजरात युनिव्हर्सिटी, पाटण, गुजरात येथे पार पडणार आहे. महाविद्यालयातून या शिबिरासाठी निवड होणारा तो पहिला विद्यार्थी ठरला आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाविद्यालयाकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.
श्रेयश यांच्या या यशामध्ये भारती विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. डॉ. ए.आर. म्हेत्रे, प्रोग्राम ऑफिसर प्रविण चव्हाण, प्रा. प्रशांत यादव (प्रोग्राम ऑफिसर), प्रा. सागर बंडपट्टे (को-प्रोग्राम ऑफिसर) आणि सर्व समर्पित राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांचे योगदान आणि मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे.
विशेष मार्गदर्शन व आशीर्वाद प्रधानाचार्य डॉ. राजेश प्रसाद, उपप्रधानाचार्य डॉ. सचिन चव्हाण, डॉ. सुनीता जाधव आणि HOD डॉ. डी.एस. बांकऱ यांच्याकडून मिळाले, ज्यांच्या प्रेरणेत (एन एस एस) स्वयंसेवक उत्कृष्टतेकडे वाटचाल करतात.


Post a Comment
0Comments