अल्ताप शिकलगार वांगी :
वांगी(ता.कडेगांव) येथील सिद्धनाथ करिअर अकॅडमीने घवघवीत यश मिळवले असुन, शेखर मोहिते (सर) यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या या सिद्धनाथ करियर अकॅडमीने मोठी झेप घेतली आहे.
ग्रामीण भागातील तरूणांनी आर्मी ,पोलीस, सरळसेवा भरती या स्पर्धा परिक्षांमध्ये सिध्द होण्यासाठी परिसरातील तरूण पिढी एकवटली आहे . सिद्धनाथ करियर अकॅडमी च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन केले जात आहे .
चोवीस तास अभ्यासिका,लेखी सराव,लेक्चर,मैदानी चाचणी परिक्षा तसेच तरुणाकडुंन अभ्यास करून घेण्यासाठी ते मोठे परिश्रम घेत आहेत. त्यामुळे परिसरातील मोठ्या संख्येने विद्यार्थी विविध विभागात भरती होण्यास शेखर मोहिते यांचे योगदान आहे.
यावेळी कु. सुरज बाळासो पाटिल (सोनकिरे), कु.अमन दस्तगीर आगा( देवराष्ट्रे), यांची IRB गट क्रं 3,SRPF गट नं 16 कोल्हापूर येथे निवड झाली.
तसेच कु.राजेंद्र जनार्दन प्रधान ( वांगी),कु.भावेश सयाजी होनमाने ( वांगी),कु.किशोर तानाजी होनमाने ( वांगी),कु नागेश दिनकर साठे ( देवराष्ट्रे) ,कु.सुमित सुनिल माळी (वांगी)यांची गृहरक्षक दल महाराष्ट्र यामध्ये निवड झाली आहे.
त्यांच्या या निवडी बद्दल सिद्धनाथ करिअर अकॅडमी वांगी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी, गोरख औधे (पत्रकार) , अभिजीत कोळी, सादिक आगा, संचालक- शेखर मोहिते ,सहसंचालक-सचिन मोहिते तसेच विद्यार्थी व पालक वर्ग यांचे वतिने सत्कार करण्यात आले .

Post a Comment
0Comments