yuva MAharashtra ४४ व्या राज्य ज्युनियर शूटिंग हॉलीबॉल अजिंक्यपद सांगली संघाकडे

४४ व्या राज्य ज्युनियर शूटिंग हॉलीबॉल अजिंक्यपद सांगली संघाकडे

Admin
By -
0

 

फोटो ओळ : सांगली : शुटिंग हॉलीबॉल स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार जिल्हा निवड समिती मार्फत करण्यात आला.


कडेगाव : प्रतिनिधी 

टेंभुर्णी येथे झालेल्या ४४ व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर मुले व मुली शूटिंग हॉलीबॉल अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत मुलींमध्ये सांगली जिल्हा संघाने तर मुलांमध्ये नाशिक जिल्ह्याने अजिंक्यपद मिळविले.

        या स्पर्धा टेंभुर्णी येथील संत रोहिदास आश्रम शाळा येथे संपन्न झाल्या. स्पर्धेचे उद्घाटन खासदार धैर्यशील मोहिते- पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कैलास सातपुते उपस्थित होते. 

      सांगली जिल्हा मुलीच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवून शूटिंग बॉल मध्ये आपला दबदबा कायमचा ठेवला. संघातील चार मुली व दोन मुलाची दिल्ली (गाझियाबाद) येथे दिनांक ७ ते ९ ऑक्टोबर २०२५ रोजी होणाऱ्या राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे .

बक्षीस वितरण महाराष्ट्र राज्य ॲम्युचिअर स्पोर्ट्स शूटिंग बॉल संघटनेचे अध्यक्ष संग्राम देशमुख यांच्या शुभ हस्ते झाले.

दिल्ली (गाझियाबाद) येथे होणाऱ्या राष्ट्रीय शुटिंगबॉल स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्यातून निवड झालेल्या प्राजक्ता आवळे, प्रिती काळे, तेजस्वी करे, अनुजा हांडे, आयुष यादव,रितेश शिंपी या खेळाडूंचा सत्कार जिल्ह्याचे अध्यक्ष ऐ.बी जमदाडे, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार व सदस्यांच्या उपस्थित करण्यात आला.

अशी माहीती सांगली जिल्हा शूटिंगबॉल असोसिएशनचे सचिव खाशाबा यादव यांनी दिली.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)