yuva MAharashtra ऊसदरावरून शेतकरी संघटना व मनसे आक्रमक

ऊसदरावरून शेतकरी संघटना व मनसे आक्रमक

Admin
By -
0

 


ऊसाला प्रति टन पाच हजार रुपये दर द्यावा अन्यथा ऊस व साखर शेतकरी संघटना, मनसे व शिव,फुले,शाहू आंबेडकर चळवळ अडवणार.                      

 सोनहिरा सहकारी साखर कारखाना लिमिटेड वांगी व जी डी बापू लाड क्रांती सहकारी साखर कारखाना कुंडल या कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांना शेतकरी संघटना रघुनाथ दादा पाटील प्रणित तसेच महाराष्ट्र नव निर्माण सेना व शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीतील पदाधिकारी यांनी २४ ऑक्टोबर रोजी दोन्ही साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना आपल्या निवेदनाद्वारे मागणी केली आहे. 




की,यावर्षीच्या गळीतास येणाऱ्या उसाला ५००० रूपये हजार रुपये प्रति टन भाव द्यावा. तसेच, शेतकऱ्यांनी वजन करून आणलेला ऊस स्वीकारला जाईल असे आपल्या कारखान्यामार्फत जाहीर करावे अशा पद्धतीचे निवेदन शेतकरी संघटना कडेगाव तालुका अध्यक्ष परशुराम माळी यांनी व आरपीआय आंबेडकर गट. बहुजन समाज पार्टी. वंचित बहुजन आघाडी.जनता क्रांती दल.डेमाॅक्राॅटीक पार्टी ऑफ इंडिया. एम एम ग्रुप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

 सदर निवेदनाची दखल घेऊन तात्काळ उसाचा दर जाहीर करावा अन्यथा वरील सर्व संघटनांच्या वतीने जिल्हाभर ऊस वाहतूक रोखणे व साखर कारखान्यातून साखर बाहेर पडून न देणे हे आंदोलन हाती घेण्यात येईल व याच्या होणाऱ्या परिणामाची जबाबदारी जिल्हा प्रशासन व सर्व साखर कारखाना वर राहील असे निवेदनात म्हंटले आहे 



सदर निवेदनावर महादेव होवाळ आरपीआय सांगली जिल्हा अध्यक्ष, शिवलिंग सोनवणे बहुजन समाज पार्टी जिल्हा महासचिव, जीवन सरकटे वंचित बहुजन आघाडी, जिल्हा उपाध्यक्ष परशुराम माळी शेतकरी संघटना, विशाल शिंदे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडेगाव तालुका अध्यक्ष, विजय माळी शेतकरी संघटना युवा जिल्हाध्यक्ष अध्यक्ष, श्याम येडेकर शेतकरी संघटना पलूस तालुकाध्यक्ष, 

जितेंद्र सोरटे आर पी आय कडेगाव तालुका अध्यक्ष, रुपेश कांबळे सिद्धार्थ माने, आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष, गणेश गायकवाड शेतकरी संघटना युवा अध्यक्ष कडेगाव तालुका प्रसाद वडार शेतकरी संघटना वांगी शाखा अध्यक्ष भाऊसाहेब पवार जिल्हाध्यक्ष नाना पाटील ब्रिगेड, सौरभ शिंदे, प्रशांत शिंदे मिराज शिंदे, प्रणिल शिंदे, माणिक अंबवडे, तुषार करकटे यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)