वांगी :
कडेगांव तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व पत्रकार मोहन शिवाजी मोहिते यांना हुतात्मा बहुउद्देशीयविकास कल्याणकारी संस्था यांच्या विद्यमाने सातारा येथे आयोजित केलेल्या ५ वा राज्यस्तरीय सह्याद्री गौरव पुरस्कार २०२५ मध्ये आदर्श पत्रकार हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले ,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुनील फडतरे, संस्थेचे सल्लागार जयवंतराव घोरपडे सरकार, सुशांत शिवदास, विलास मोरे, कृष्णा खोरे अधीक्षक जालिंदर महाडिक, स्वराज्य रक्षक मालिका लेखक प्रताप गंगावणे प्रमुख उपस्थित होते .
वांगी (ता. कडेगांव) येथील मोहन मोहिते हे दैनिक लोकमत मध्ये गेली २५ वर्षे पत्रकार म्हणून काम करीत आहेत . ते कडेगांव तालुका मराठी पत्रकार संघाचे दोन वेळा अध्यक्ष झाले होते . त्यानी तळागाळातील लोकांना आपल्या लेखणीतुन न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे.
त्याना सांगली येथे केंद्रीय पत्रकार संघाच्या वतीने आदर्श पत्रकार , पन्हाळा येथे पन्हाळा गौरव , अक्कलकोट येथे अक्कलकोट भूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या कामाची दखल घेऊन हुतात्मा बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्थेने सातारा येथे आयोजीत केलेल्या ५ वा राज्यस्तरीय सह्याद्री गौरव पुरस्कार २०२५ - मध्ये आदर्श पत्रकार हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी विक्रम देशमुख , संदीप चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने राज्यभरातून आलेले मान्यवर उपस्थित होते .

Post a Comment
0Comments