yuva MAharashtra महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून वांगी ग्रामपंचायतीस निवेदन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून वांगी ग्रामपंचायतीस निवेदन

Admin
By -
0

 वांगी गावातील विवीध सामाजिक विषयांबाबत आज ग्रामपंचायत वांगी याना निवेदन देण्यात आले. निवेदनातील मागण्या पुढीलप्रमाणे : 

खिंडारमुक्त गाव मोहीम:

गावात अनेक जुनी घरे मोडकळीस आलेली असून त्यांचे अवशेष खिंडाराच्या स्वरूपात उभे आहेत. यामुळे सौंदर्यहानीसह अपघाताची शक्यता आहे. नागरिकांनी आपल्या शेतात नवीन घरे बांधल्यामुळे ही घरे निरुपयोगी झाली आहेत. तरी ग्रामपंचायतीने विशेष मोहीम राबवून ही खिंडारे स्वच्छ करून गाव “खिंडारमुक्त” करावे.

 2. अंगणवाडी क्र. 50 परिसर स्वच्छता व संरक्षक उपाययोजना:

अंगणवाडी क्र. 50 च्या परिसरात नियमित स्वच्छतेची गरज आहे. तेथे कचरा कुंडीची व्यवस्था करण्यात यावी. शिवाय, या परिसरास संरक्षित ठेवण्यासाठी योग्य उंचीची संरक्षक भिंत उभारावी.

 3. पुरातन आडाचे जतन व सुरक्षितता:

गावातील एक पुरातन आड सध्या न वापरता पडून आहे व त्याच्या सभोवतालचे बांधकाम मोडकळीस आलेले आहे. ही ठिकाणे धोकादायक असून, संबंधित बांधकाम दुरुस्त करून आड जाळीने पूर्णपणे बंद करण्यात यावा, जेणेकरून कोणताही अपघात होणार नाही.

 4. ग्रामपंचायत इमारतीखालील अवैध पार्किंग रोखावे:

ग्रामपंचायत इमारतीच्या खाली काही नागरिकांकडून अवैध पार्किंग करण्यात येत आहे, जे चुकीचे आहे. यामुळे गोंधळ निर्माण होतो. तरी कृपया, पार्किंगसाठी ठरविलेल्या जागीच वाहने लावण्याचे स्पष्ट सूचना फलक लावण्यात यावे व अवैध पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)