दरवर्षी जगभर ५ जून जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागरूकता, ग्लोबल वॉर्मिंग आणि वन्यजीव गुन्हेगारी यांसारख्या पर्यावरणीय समस्यांवर जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिन साजरा करतात.
पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी यादिवशी वेगवेगळे पर्यावरण विषयक जागरूकता आणि कृती कार्यक्रम आयोजित केले जातात.
त्याचाच एक भाग म्हणून आज चिंचणी वांगी पोलीस ठाणे येथे जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने पोलीस ठाणे आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे, पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार, पोलीस अंमलदार, चिंचणी वांगी पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गावातील पोलीस पाटील व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष यांचे उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.

Post a Comment
0Comments