वडियेरायबाग ता. कडेगांव जि. सांगली येथील महिलेकडून तब्बल 948 ग्रॅम वजनाचा 18960 किंमतीचा गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्या प्रकरणी चिंचणी वांगी पोलिसांनी छापा टाकून पकडला.
चिंचणी वांगी पोलिसांकडून मिळालेली माहिती पुढीलप्रमाणे,
वडियेरायबाग ते आंबेगाव जाणाऱ्या रोडला ताकारी कॅनॉल लगत सदर महिला जयश्री मुन्ना कराळे रा. वडियेरायबाग ता. कडेगांव जि. सांगली (वय 45) ही महिला घरातून गांजा विक्री करत असल्याची माहिती,
चिंचणी वांगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली.
त्यानंतर पोलिस निरीक्षक घुगे यांनी स्वतः जावून खात्री केली असता सदर महिला गांजा विक्री करत असल्याचे निदर्शनास आले त्यानंतर सदर महिलेच्या घराची तपासणी केली असता,
किचनमध्ये कडप्पा फरशीच्या कपाटाखाली गांजा प्लास्टिक पिशवीत बांधून ठेवला असल्याचा सापडला सदर महिलेवर गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 20 (ब),22 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे करीत आहेत.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे, पोलिस उपनिरीक्षक योगेश शेलार, पो.हे.कॉन्स्टेबल हरिदास पवार, मनोज जाधव, गणेश तांदळे.
पो. कॉन्स्टेबल नवनाथ रावताळे, शिवाजी हिप्परकर, महिला पोलिस कॉन्स्टेबल योगिता आरबूने यांनी केली. सदर कारवाईवेळी पोलिस उपनिरीक्षक प्रवीण जाधव, पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, धनश्री माळी, पो.ना.पुंडलिक कुंभार व सर्व पोलिस ठाणे, पो.हे.कॉन्स्टेबल अमोल पाटील गुन्हे प्रकटीकरण शाखा विटा यांचे विशेष सहकार्य लाभले.

Post a Comment
0Comments