खानापुर येथील श्री.महादेव मंदीरातील घटना व कुंडल येथील श्री.गिरी पार्श्वनाथ मंदिरातील घडलेल्या घटनेच्या पार्श्वभुमीवर, यासारख्या घटनासंदर्भात प्रतिबंधक उपाययोजना म्हणून,
चिंचणी वांगी पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गावांमधील मंदीर, मस्जिद, दर्गा, बौध्दविहार यासारख्या धार्मिकस्थळाचे पुजारी, व्यवस्थापक व ट्रस्टी यांची बैठक चिंचणी वांगी पोलीस ठाणे येथे पार पडली.
यावेळी सहा.पोलीस निरीक्षक श्री राहुल घुगे यांनी सदर बैठकीस मार्गदर्शन करताना एखादी अप्रिय घटना घडून गेल्यानंतर प्रतिबंधक उपाययोजना करण्यापेक्षा घटना घडण्याच्या आधी सर्व धार्मिकस्थळांचे ठिकाणी चांगले प्रतीचे सीसीटीव्ही कॅमेरे लावणे,
सर्व धार्मिक स्थळे मजबुत व बंदिस्त करुन घेणे, धार्मिकस्थळांचे ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करणे, ज्या धार्मिक स्थळावरती भोंगे लावले जातात त्यांनी सर्व कागदपत्रांची पुतर्ता करुन रितसर परवाना प्राप्त करुन घेणे,
धार्मिक स्थळांचे पावित्र जपण्यासाठी संबंधितांनी पुढाकार घेणे, सोशल मिडीचा वापर काळजीपूर्वक करणे, सोशल मिडीयावरती प्रसारीत होणारे आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित न करणे किंवा त्याबाबत प्रतिक्रिया न देणे, सोशल मिडीयावरील प्रसारीत होणारे अफवावर विश्वास न ठेवणे, त्यावर विश्वास ठेवून वाद विवाद न करणे याबाबत सविस्तर सुचना देण्यात आल्या. तसेच पोलीस खात्यामार्फत राबविले जात असले डायल 112 चा वापर नुसत्या भांडणाच्या वेळी न करता प्रत्येक वेळी करावा याबाबत मार्गदर्शन केले आहे.
यावेळी चिंचणी वांगी पोलीस ठाणे हद्दीतील मंदीर, मस्जिद, दर्गा, बौध्दविहार या धार्मिकस्थळाचे पुजारी, व्यवस्थापक व ट्रस्टी मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment
0Comments