yuva MAharashtra अवैद्य खाजगी सावकारी विरोधात नागरिकांनी तक्रार द्यावी : जिल्हाधिकारी अशोक काकडे

अवैद्य खाजगी सावकारी विरोधात नागरिकांनी तक्रार द्यावी : जिल्हाधिकारी अशोक काकडे

Admin
By -
0

 

२० मार्च रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा उपनिबंधक आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना खाजगी सावकारांच्या अवैध व्यवहारांविरोधात निवेदन देण्यात आले होते. काल जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अवैध सावकारकीविरोधात तक्रार करावी.


जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, नागरिकांनी तक्रार जिल्हा उपनिबंधक कार्यालय किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात करावी. तसेच, नागरिकांनी फक्त अधिकृत कर्ज परवाना धारकांकडूनच कर्ज घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.


मनसे मागील दोन महिन्यांपासून सातत्याने या समस्येवर आवाज उठवत आहे. जर कोणत्याही नागरिकास खाजगी सावकार त्रास देत असेल, जबरदस्ती करत असेल किंवा अवैध व्याज घेत असेल, तर त्यांनी मनसे कार्यालय, वांगी येथे संपर्क साधावा.


आपली माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल.

मनसे आपल्या प्रत्येक नागरिकाच्या ठामपणे पाठीशी आहे.


– महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कडेगाव




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)