कुंभार गल्ली येथील स्मशानभूमीची सद्यस्थिती अत्यंत दयनीय आहे. परिसरात झाडाझुडपं वाढलेली असून, कचऱ्याने परिसर भरला आहे.
नागरिकांना तेथे उभा राहण्यास जागा नाही.
तरी, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या स्मशानभूमीची योग्य डागडुजी करून तिचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी खालील सुधारणा करण्यात याव्यात अशी मनसेकडून निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
1.स्मशानभूमीची सीमारेषा निश्चित करून मजबूत कंपाउंड वॉलचे बांधकाम करणे.
2.विद्यमान शेडसोबत अंत्यसंस्कारासाठी आवश्यक चबुतऱ्याची सुविधा उपलब्ध करणे.
3.माणसांना बसण्यासाठी पक्क्या कॉंक्रिटच्या जागेची (फर्शी) व्यवस्था करणे.
4.परिसराची स्वच्छता राखण्यासाठी कचरा पेटी व पाण्याच्या टाकीची सोय करणे.
5.रात्रीच्या वेळी उपयोग होण्यासाठी प्रकाशव्यवस्थेची (लाईट) सुविधा उपलब्ध करणे. यासाठी ग्रामपंचायत वांगी याना पत्र दिले आहे.



Post a Comment
0Comments