चिंचणी वांगी पोलीस ठाणे हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच जनतेच्या मालमत्तेची व जीविताची हानी टाळण्यासाठी
चिंचणी वांगी पोलीस ठाणेच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रथमेश उर्फ हरजित अशोक शेळके (रा. वडियेरायबाग ता. कडेगाव) तसेच गजानन शामराव वडार (रा. वांगी ता. कडेगाव) या दोघांना चिंचणी वांगी पोलीस ठाणेच्या प्रस्तावानुसार
दोन वर्षाकरिता सांगली सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून हद्दपारीचे आदेश कडेगाव उपविभागीय अधिकारी रणजीत भोसले यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 नुसार दिले आहेत.
चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात प्रथमेश उर्फ हरजीत अशोक शेळके याचेवर 3 तर गजानन शामराव वडार याचेवर 4 गुन्हे नोंद आहेत .अशी माहिती, चिंचणी वांगी पोलीस ठाण्यातून देण्यात आली.


Post a Comment
0Comments