कडेगाव तालुक्यातील काही प्रशासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी मागील ५ ते १० वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी अनियमितता तसेच भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.
प्रशासनाच्या कार्यक्षमतेत पारदर्शकता आणि जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करणे गरजेचे आहे.
नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, असे निवेदन सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडेगांव यांनी दिले आणि त्यांचे कडेगांव येथे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.


Post a Comment
0Comments