![]() |
| मयत युवक साहिल जाधव |
वांगी येथे झालेल्या अपघातामध्ये साहिल दिलीप जाधव या युवकाचा मृत्यू झाला.
सदर अपघाताची चिंचणी वांगी पोलिस ठाणे मध्ये नोंद झाली असून मिळालेली अधिक माहिती अशी की,
गुरुवार दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी वांगी गावचे हद्दीत वांगी रामापुर रोडला साहिल दिलीप जाधव वय 19 वर्षे व अमित विजय पाटोळे वय 20 वर्षे दोघेही रा. शेळकबाव तालुका. कडेगांव जिल्हा. सांगली हे युवक मोटारसायकल (MH 12 KW 3004) मध्ये तेल भरण्यासाठी पंपाच्या दिशेने जात असताना रामापूर् कडून भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो पिकअप मालवाहतूक (गाडी क्रमांक MH 12 VT 4329) गाडीने मोटारसायकल ला उजव्या बाजूने धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की साहिल जाधव गंभीर जखमी झाला तर अमित पाटोळे किरकोळ जखमी झाला. साहिल यास अँब्युलन्स मधून तात्काळ कृष्णा हॉस्पिटल कराड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र शुक्रवार दिनांक 3 जानेवारी रोजी उपचारादरम्यान साहिल याची प्राणज्योत मावळली.साहिल चे निधन झाल्याचे वृत्त समजताच संपूर्ण शेळकबाव गावासह परिसरात शोककळा पसरली.
सदर घटना घडल्यानंतर बोलेरो पिकप घेवून चालक दत्तू रामभाव
अनारसे वय 46 वर्षे मूळ रा. आष्टी जिल्हा. बीड सध्या रा. वाघोली तालुका.हवेली जिल्हा.पुणे हा घटनास्थळावरून पसार झाला होता.
चिंचणी वांगी पोलिस अधिकारी यांनी सदर गाडीचा शोध घेण्याकरिता पोलिस पथकाला आदेश दिले.त्यानंतर वडुज चौक सातारा ते पाचवा मैल सांगली या दरम्यानचे रोडवर व आजूबाजूला असणारे सुमारे 150 सीसीटीव्ही फुटेज चेक करून अपघात करुन निघून गेलेली बोलेरो पिकप गाडीचा शोध घेत असताना सदर गाडी पाचवा मैल तालुका तासगांव या ठिकाणी मिळून आली.
चालक रामभाव अनारसे याचेकडे कसून चौकशी केली असता, त्याने सदर अपघाताची कबुली दिली. सदर बोलेरो पीकप गाडी व चालकास पुढील तपासाकरिता ताब्यात घेण्यात आले आहे.
मा.पोलिस अधिक्षक संदीप घुगे सांगली, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विटा विपुल पाटील, चिंचणी वांगी पोलिस ठाणेचे प्रभारी अधिकारी राहुल घुगे यांचे मार्गदर्शनाखली चिंचणी वांगी पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार, श्रेणी पोलिस उपनिरीक्षक पाटिल, सहाय्यक पोलिस फौजदार साळुंखे, पोलिस हवालदार विनायक सावळगे, पोलिस कॉन्स्टेबल संकेत सावंत पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment
0Comments