कडेगाव मधील कॉलेजच्या आसपास कॅफेच्या नावाखाली बंदिस्त प्रायव्हसी कॅफे चालू आहेत. परंतु त्या प्रायव्हसी कॅफे मध्ये कॉलेज वर्गातील मुले चुकीच्या मार्गाचा अवलंब करून लागले आहेत.
अशा काही घटना निदर्शनास आल्या आहेत. यापूर्वी कडेगाव येथील अशा बंदिस्त प्रायव्हसी कॅफेवर करावी झाल्या आहेत. कॅफे मालकास कॉलेजच्या मुलांनी जादा पैसे दिल्यास मुलांना तासन-तास त्या ठिकाणी थांबण्याची मुबा मिळते.
यामुळे त्या ठिकाणी अनुचित प्रकारे घडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणावरती, त्यांच्या संस्कारावरती विपरीत परिणाम होत आहेत. परिणामी यामध्ये गुरफटलेली मुले आई-वडिलांच्या व इतर नातेवाईकांच्या धाकात राहत नाहीत .अशा वाया जाणाऱ्या मुलांपासून त्या कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची वाताहात होऊ शकते. तरी संबंधित कॅफे मालकावर कायदेशीर कारवाई करावी व कडेगाव तालुक्यातील अशा बंदिस्त प्रायव्हसी कॅफे कायमस्वरूपी बंद करण्यात याव्या.
येत्या दहा दिवसात या कॅफे मालकावर कारवाई झाली नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल या प्रकारचे निवेदन मा. तहसीलदार कडेगांव यांना देण्यात आले.


Post a Comment
0Comments