सालाबादप्रमाणे माघ पौर्णिमेला 12 फेब्रुवारीपासून वांगी गावची यात्रा सुरू होणार आहे. यात्रे मध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा.
अश्या मागणीचे निवेदन, मनसे तालुका अध्यक्ष विशाल शिंदे यांनी चिंचणी वांगी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल घुगे यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,
18 व 19 फेब्रुवारी रोजी यात्रेतील मुख्य दिवस असून या दोन दिवशी गावामध्ये प्रचंड गर्दी असते. या कालावधीमध्ये ट्रॅफिक समस्या व वाहन अपघात होऊ नये.
तसेच, रोड रोमियोंकडून मुलींची छेडछाड करणाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात यावा. टारगेट मुला मुलांमध्ये मारामारी चे प्रकार होऊ नये तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी 18 व 19 फेब्रुवारी रोजी पोलीस बंदोबस्त लावण्यात यावा.


Post a Comment
0Comments