![]() |
फोटो: चिंचणी येथे वार्षिक पारितोषिक वितरण व स्वाती हस्तलिखित प्रकाशन सोहळा प्रसंगी किरण (तात्या) लाड ,अॅड.रमेश मदने ,सी.एस.माने, एस. व्ही.पाटील, सौ. एम.ऐ.भानूसे इतर मान्यवर |
:चिंचणी (अं ) येथील श्री.शिवाजी हायस्कूल मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण व स्वाती हस्त लिखित प्रकाशन सोहळा तसेच स्नेहसंमेलन संपन्न
क्षेत्रात नाविन्यपुर्ण बदल होत आहेत यात गावाने पुढाकार घेतला पाहिजे.आदर्श गाव निर्माण करणारी माणस तयार करायची असतील तर शिक्षण संस्थानी आदर्श काम केली पाहिजेत, मुलांना चांगले घडवा.
सर्वांनी आत्मविश्वासाने कामे करा सर्व विद्यार्थ्यांनी पारितोषिके प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करावेत , असे प्रतिपादन गांधी एज्युकेशन सोसायटी कुंडलचे समन्वय समिती सचिव किरण (तात्या) लाड यांनी केले.
ते कडेगांव तालुक्यातील चिंचणी (अं ) येथे श्री शिवाजी हायस्कूलचा शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये शुक्रवार, दि. ०३ जानेवारी रोजी वार्षिक पारितोषिक वितरण व स्वाती हस्त लिखित प्रकाशन सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्ष मनोगतामध्ये बोलत होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे चिंचणी ग्रामपंचायतचे सरपंच ऍडव्होकेट रमेश मदने उपस्थित होते.
मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी या शैक्षणिक वर्षातील कला, क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांंना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच स्वाती हस्त लिखीत संग्रहाबद्दल व विद्यार्थ्यांच्या प्रगती बद्दल पाहुण्यांनी भरभरून कौतुक केले.
याप्रसंगी ऍडव्होकेट रमेश मदने म्हणाले की,शाळेने मला भरभरून दिले आहे.जे आज आहे,ते केवळ शाळेमुळेच आहे.गुरुंच्या मार्गदर्शना मुळे घडलो. क्रांतीअग्रणी डॉ जी.डी. बापूंच्या विचारांचा वसा व वारसा या चिंचणी नगरीला मिळाला
तसेच शिक्षकांच्या कार्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता चांगली झाली आहे.याही पेक्षा पालकांना आत्मनिर्भय होण्यासाठी विद्यार्थ्यांनी समाजात मान खाली जाऊ नये यासाठी तत्व बाळगले तर चांगला माणूस घडेल असे सांगितले.
यावेळी गांधी एज्युकेशन सोसायटी कुंडल चे सहसचिव वसंत लाड, क्रांती सहकारी साखर कारखान्याचे संचालक वैभव पवार , गांधी एज्युकेशन सोसायटी कुंडल चे संचालक सी.एस. माने ,टी.एम.जाधव, संदिप पाटील, लालासाहेब महाडीक, संदेश जाधव, विक्रम देशमुख, शिवाजी जाधव, सुनिल पाटील, मुख्याध्यापक एस. व्ही. पाटील तसेच पालक, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरखनाथ घुगे व राहुल कुंभार यांनी केले तर आभार उमाकांत सांवत यांनी मानले.

Post a Comment
0Comments