yuva MAharashtra कमला ऑर्थोपॅडिक ठरतेय गोर गरिबांसाठी वरदायिनी

कमला ऑर्थोपॅडिक ठरतेय गोर गरिबांसाठी वरदायिनी

Admin
By -
0

 


पलूस, कडेगांव आणि तासगांव तालुक्यासह आसपासच्या परिसरातील असंख्य गरजू गोरगरीब रुग्णांसाठी पलूस मधील कमला ऑर्थोपॅडिक हॉस्पिटल हे वरदायिनी ठरत आहे.

डॉ. मनोजकुमार इंगळकर यांनी 2004 साली हॉस्पिटलची स्थापना केली. तेंव्हापासून आज अखेर अविरत पणे रुग्णसेवा सुरळीत सुरू आहे.

डॉ मनोजकुमार इंगळकर यांच्या कमला ऑर्थोपॅडिक हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना (प्रधानमंत्री जन आरोग्य योजना), मुख्यमंत्री सहाय्यता निधी या योजना प्रभावीपने राबवल्या जात आहेत. 

ज्यामुळे अत्यंत गोर गरीब व गरजू रुग्णांना याचा आधार मिळत आहे. सदर योजनेची सर्व रुग्णांना संपूर्ण माहिती देवून रुग्णाला सर्वतोपरी या योजनांचा लाभ मिळावा यासाठी हॉस्पिटल मध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन आहे. ज्यामधे आरोग्य मित्रांद्वारे संपूर्ण सहकार्य रुग्णांना केलें जाते.


हॉस्पिटल मध्ये जवळपास 20 ते 22 कर्मचारी आहेत. सर्व कर्मचारी अत्यंत प्रामाणिक व सन्मानपूर्वक सर्व रुग्णांची तपासणी व देखभाल करतात.हॉस्पिटल मधील स्वच्छ्ता अत्यंत कौतुकास्पद आहे.

डॉ. मनोजकुमार इंगळकर यांच्या कमला ॲक्सिडेंट अँड ऑर्थोपॅडिक हॉस्पिटल मध्ये केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया पुढीलप्रमाणे :

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत केसरी पिवळे रेशन कार्डधारकांना मोफत शस्त्रक्रिया.

 आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया व उपचार.

 अंत्योदय व अन्नपूर्णा कार्डधारकांसाठी मोफत उपचार.

 ESIC शासन कर्मचारी योजना लागू व मोफत उपचार.

 मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत गुडघा बदली, सांधा बदली व भाजलेल्या रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया व उपचार.

 मूकबधिर, अंध, मतिमंद रुग्णांसाठी मोफत उपचार.

 SBI जनरल हेल्थ इन्शुरन्स मेडिक्लेम कॅशलेस सुविधा उपलब्ध.

 युनिक हेल्थकेअर तृतीय, चतुर्थ श्रेणी राज्य कर्मचारी यांच्यासाठी कॅशलेस उपचार सुविधा उपलब्ध.

 हेल्थ असिस्टंट व आर ए एन एम नर्सिंग कोर्स प्रवेश चालू.


तसेच या रुग्णालयात केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया पुढीप्रमाणे : 

सर्व प्रकारच्या एक्सीडेंट, फ्रॅक्चर यावरील शस्त्रक्रिया व उपचार.

 मणक्याचे विकार यावर शस्त्रक्रिया व उपचार.

 गुडघ्याचे विकार व दुर्बिणीचे शस्त्रक्रिया.

 कृत्रिम सांधारोपण, खुबा, गुडघ्यांच्या.

 स्पोर्ट्स मेडिसिन व फिजिओथेरपी तसेच, लवकरच डायलेसिस (Dialysis ) करण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध होणार आहे.


डॉ. मनोजकुमार इंगळकर 20 वर्षांपासून अविरतपने अखंडित रुग्णसेवा सुरळीत करत आहेत. त्यासोबत त्यांच्या कर्मचारी वर्गामध्ये मुनीर शेख, निलेश जाधव दोन तरुण कर्मचारीही प्रामाणिक, जबाबदारीने व सर्व रुग्णांना सन्मानाची वागणूक देत आपले कर्तव्य बजावत आहेत.

 कमला एक्सीडेंट अँड ऑर्थोपेडिक हॉस्पिटल पुढेही अश्याच प्रकारे रुग्णसेवा देत राहो ही सदिच्छा.


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)