yuva MAharashtra भाळवणीत बालिका दिन उत्साहात साजरा

भाळवणीत बालिका दिन उत्साहात साजरा

Admin
By -
0

 


अल्ताप शिकलगार :

भाळवणी (ता. खानापूर) येथे बालिका दिन उत्साहात साजरा झाला. या  दिनानिमित्त क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

 उद्यानविद्या महाविद्यालयाच्या दूतांनी ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम व औद्योगिक जोड २०२४-२५ अंतर्गत हा कार्यक्रम ग्रामपंचायत येथे भाळवनीचे विद्यमान सरपंच आनंदराव आदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.


यावेळी सरपंचांनी अभिवादनपर भाषण केले.सावित्रीबाईंबद्दल सांगत असताना त्यांनी त्यांच्या दैदिप्यमान कार्याला उजाळा दिला. यावेळी महिला सदस्य सुद्धा उपस्थित होत्या.

यावेळी शंतनू सावंत, सत्येन फडतरे,शुभम पवार हे उद्यान विद्यादूत उपस्थित होते.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)