उपाध्यक्षपदी हेमा मोहिते
वांगी (ता. कडेगांव) येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत नवीन शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठीत करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रा. सत्यवान कोळेकर यांची तर उपाध्यक्षपदी सौ. हेमा मोहिते यांची निवड करण्यात आली.
वांगी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब माने यांच्या अध्यक्षतेखाली व शिक्षक सतीश शिर्के, देशमुख सर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांच्या उपस्थितीत शाळा व्यवस्थापन समिती निवडीची प्रक्रीया पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी प्रा. सत्यवान कोळेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष सत्यवान कोळेकर यांचा सत्कार मावळते अध्यक्ष सचिन दाईंगडे व शाळेच्यावतीने करण्यात आला.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या सचिवपदी मुख्याध्यापक बाळासाहेब माने, सदस्यपदी सचिन सूर्यवंशी, सुरेखा कळसापणावर, शितल औंधे, मिनाज पटवेकरी, दत्तात्रय वाघिरे, धनंजय मोहिते, देवानंद कांबळे, प्रियांका सूर्यवंशी, रेश्मा कांबळे, गणेश खटावकर, शिक्षक प्रतिनिधी सदस्या सौ. वंदना मोहिते, विद्यार्थी प्रतिनिधी श्रद्धा गायकवाड, स्वरांजली मोहिते यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी शालेय विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक व व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी धनंजय मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले. आभार प्रा. सत्यवान कोळेकर यांनी मानले.

Post a Comment
0Comments