कडेगाव तालुक्यातून जरंडेश्वर साखर कारखान्यास ५६ हजार मेट्रिक टन ऊसाचा पुरवठा : राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष कृष्णत मोकळे यांची माहिती.
जरंडेश्वर शुगर मिल्स या कारखान्याने चालू गळीत हंगामात १६ लाख ७२ हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप पूर्ण केले आहे. यामध्ये कडेगाव तालुक्यामधून ५६ हजार ६६९ मेट्रिक टन ऊस गळीतास गेला आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कृष्णत मोकळे यांनी दिली.
मोकळे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जरंडेश्वर शुगर मिल्स हा साखर कारखाना सुरू आहे. या कारखान्याने चालू गळीत हंगामात १६ लाख ७२ हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे. या कारखान्याने राज्यात उच्चांकी गाळप केलेल्या साखर कारखान्यांमध्ये राज्यात दुसरा क्रमांक आहे.
ते म्हणाले, या साखर कारखान्यास कडेगाव तालुक्या मधून ५६ हजार ६६९ मेट्रिक टन ऊस गळीतास गेला आहे. गळीतास गेलेल्या ऊसाला पहिला हप्ता प्रती मेट्रिक टन ३२०० रुपये दिला आहे. कडेगाव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडविण्यासाठी कारखान्याच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.
मोकळे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये काम करण्यासाठी जेष्ठ व युवकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्य शासनाच्या विविध योजनांचा निधी आणून विकासकामे करण्या बरोबरच जरंडेश्वर साखर कारखान्याच्या माध्यमातूनही काम केले जात आहे.

Post a Comment
0Comments