वांगी ता. कडेगाव येथील दोन वर्ष्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसने एक हाती सत्ता मिळवली.
प्रथम रामचंद्र शिंदे यांची वरणी लागली तर, दुसऱ्या वर्षी हबीब पटवेकरी यांना संधी मिळाली.
राष्ट्रवादीचे उपसरपंच हबीब पटवेकरी यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिला होता.रिक्त झालेल्या पदी कुमारी प्राजक्ता कदम यांची सर्वानुमते उपसरपंपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडीनंतर प्राजक्ता कदम यांचा वांगी ग्रामपंचायतमध्ये सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी स्व.डॉ. पतंगरावं कदम यांच्या लोकतीर्थ स्मारक स्थळी जाऊन अभिवादन केले.
निवडीवेळी माझी सरपंच डॉ. विजय होनमाने,माझी उपसरपंच हबीब पटवेकरी,माझी उपसरपंच बाबासो सूर्यवंशी,युवा नेते जालिंदर माळी, गजानन पोतदार सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment
0Comments