yuva MAharashtra महाराष्ट्राच्या 4 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक, 18 जवानांना शौर्य पदक

महाराष्ट्राच्या 4 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक, 18 जवानांना शौर्य पदक

Admin
By -
0


महाराष्ट्राच्या 4 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक, 18 जवानांना शौर्य पदक

नवी दिल्ली | 25 जानेवारी 2024 :

महाराष्ट्रातील चार पोलीस अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक, 18 पोलीस जवानांना शौर्य पदके, 40 पोलीस जवानांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक, गृहरक्षक आणि नागरी संरक्षणासाठी सात पदक तर सुधारात्मक सेवेसाठी नऊ पदके जाहीर करण्यात आले आहेत. अग्निशमन सेवेसाठी महाराष्ट्रातील 6 अधिकाऱ्यांना गुणवत्ता सेवेसाठी पदक जाहीर करण्यात आले आहे.


 75 व्या प्रजासत्ताक दिन – 2024 निमित्त, पोलीस, अग्निशमन सेवा, गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण दल आणि सुधार सेवेतील एकूण 1132 कर्मचाऱ्यांना शौर्य/सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. या यादीमध्ये महाराष्ट्रातील 4 पोलीस अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक, 18 पोलीस अधिकाऱ्यांना शौर्य पदके आणि गुणवत्ता सेवेअंतर्गत 40 पदके पोलीस सेवेसाठी, 6 पदके अग्निशमन सेवेसाठी, 7 पदके गृहरक्षक आणि नागरी संरक्षण तर सुधारात्मक सेवेसाठी 9 कारागृह अधिकाऱ्यांना पदके देऊन गौरविण्यात येणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस पदकांची यादी जाहीर झाली. यात महाराष्ट्रातील एकूण 78 पोलीस अधिकाऱ्यांना तर अग्निशमन विभागातील 6 अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी पदक जाहीर झाला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जाहीर झालेल्या यादीत चार श्रेणींमध्ये पुरस्काराची घोषणा झाली आहे. यात, दोन सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना प्रतिष्ठित सेवेकरिता ‘राष्ट्रपती शौर्य पदक’ (पीएमजी), 275 पोलीस अधिका-यांना ‘पोलीस शौर्य पदक’ (जीएम) तर विशिष्ट सेवेकरिता 102 ‘राष्ट्रपती पदक’ (पीएसएम) तर गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 753 पदके जाहीर झाली असून, यामध्ये महाराष्ट्र राज्याला एकूण 84 पदके जाहीर झाली आहेत. यामध्ये सहा अग्निशमन सेवेसाठी सहा पदकांचाही समावेश आहे.

यावर्षी जाहीर करण्यात आलेल्या पदकांच्या नुकत्याच झालेल्या पुनर्रचनेनंतर, प्रजासत्ताक दिन 2024 निमित्त पोलीस, अग्निशमन सेवा, गृहरक्षक आणि नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवा यांच्या एकूण 1132 कर्मचाऱ्यांना शौर्य/सेवा पदके प्रदान करण्यात आली आहेत. विविध पदकांचा सन्मान करण्यासाठीची संपूर्ण पदक व्यवस्था तर्कसंगत करण्यासह त्यात परिवर्तन करण्याच्या दृष्टीने गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारने अनेक पावले उचलली असल्याने, या अनुषंगाने , सोळा शौर्य/सेवा पदके (पोलीस, अग्निशमन सेवा, गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण आणि सुधार सेवेसाठी) तर्कसंगत करण्यात आली असून चार पदकांमध्ये राष्ट्रपतींचे शौर्य पदक (PMG)

शौर्य पदक (GM), विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक (PSM) आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (MSM) या श्रेणींमध्ये विलीन करण्यात आली आहेत.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)